धुरकटलेल्या खोलीत,
तो टकटकतोय केव्हापासून
काळवेळ त्याने मागे सोडला आहे
तुटलेली नाळ सावरत तो
अभासी विश्वात स्वत:ला शोधतो आहे
अफाट कचरा स्वत:च्या खोलीत आणि
तो अभासी स्वच्छता करतो आहे केव्हापासून
चार मित्र जोडू म्हणत म्हणत चार हजार झाले
गल्लीतला बालमित्र पक्या,
रोज नाक्यावर याची वाट पाहतो आहे
संवादाने प्रश्न सुटतात
असे तो नेहमी टंकतो केव्हापासून
बोलायला केव्हा विसरला तेव्हापासून
तिचे मिसकॉलवर मिसकॉल इग्नोर करत
भावनेचा अर्थ शोधतो अनेकांच्या लेखातून
तो टकटकतोय केव्हापासून
काळवेळ त्याने मागे सोडला आहे
तुटलेली नाळ सावरत तो
अभासी विश्वात स्वत:ला शोधतो आहे
अफाट कचरा स्वत:च्या खोलीत आणि
तो अभासी स्वच्छता करतो आहे केव्हापासून
चार मित्र जोडू म्हणत म्हणत चार हजार झाले
गल्लीतला बालमित्र पक्या,
रोज नाक्यावर याची वाट पाहतो आहे
संवादाने प्रश्न सुटतात
असे तो नेहमी टंकतो केव्हापासून
बोलायला केव्हा विसरला तेव्हापासून
तिचे मिसकॉलवर मिसकॉल इग्नोर करत
भावनेचा अर्थ शोधतो अनेकांच्या लेखातून
त्याच्या धुरकटलेल्या खोलीला,
एकच खिडकी आहे,
पण सदा बंद उगाचच
पण त्याच्या पीसीवर १० खिडक्या उघड्या कायम
त्यापण उगाचच.. पण तो म्हणतो
मी सत्य शोधतो आहे,
'येथे' समजाला माझी गरज आहे
ढीगभर रोज ऑनलाईन पिटीशन साईन करतो आहे
अगदी पहिली त्याने हजारभर
कोस दूर असलेल्या
गावात रस्ते नाही म्हणून असलेली
तेव्हापासून तेच करतो आहे,
स्वत:च्या गावात रस्तेच काय,
पाणी, शाळा, व्यवस्था नसलेले विसरून
एकच खिडकी आहे,
पण सदा बंद उगाचच
पण त्याच्या पीसीवर १० खिडक्या उघड्या कायम
त्यापण उगाचच.. पण तो म्हणतो
मी सत्य शोधतो आहे,
'येथे' समजाला माझी गरज आहे
ढीगभर रोज ऑनलाईन पिटीशन साईन करतो आहे
अगदी पहिली त्याने हजारभर
कोस दूर असलेल्या
गावात रस्ते नाही म्हणून असलेली
तेव्हापासून तेच करतो आहे,
स्वत:च्या गावात रस्तेच काय,
पाणी, शाळा, व्यवस्था नसलेले विसरून
धुरकटलेल्या खोलीला पहात
कधी कधी म्हणतो तो..
खूपच धूर झाला नाही..
मी उघडू खिडकी म्हणालो की
घाबरायचा, राहू दे म्हणायचा..
मला असचं बरं वाटतं...
तो सूर्य परका वाटतो...
इकडचा अंधार देखील मला ओळखतो,
पण या खिडकीच्या बाहेर...
अनोळखी लोकांचे गाव आहे...
उगाच हसतील मला पाहून
मी येथेच बरा आहे...
धुरकटलेल्या खोलीत..
टकटक करत बसलेला...
कधी कधी म्हणतो तो..
खूपच धूर झाला नाही..
मी उघडू खिडकी म्हणालो की
घाबरायचा, राहू दे म्हणायचा..
मला असचं बरं वाटतं...
तो सूर्य परका वाटतो...
इकडचा अंधार देखील मला ओळखतो,
पण या खिडकीच्या बाहेर...
अनोळखी लोकांचे गाव आहे...
उगाच हसतील मला पाहून
मी येथेच बरा आहे...
धुरकटलेल्या खोलीत..
टकटक करत बसलेला...
अरे, उडतो खिडकी...
कोण हसतं ते आपण पाहू....
तो नको नको.. म्हणत होता
मी खाडकन खिडकी उघडली....
समोरच्या बाल्कनीतून मंजुळसा
आवाज आला..
"कधीतरी ही खिडकी उघडेल ही आशा होती..
छान लिहितोस... पण ते त्या खिडकीत..
कधीतरी असा समोर बसून पण बोलना"
तोच पक्या खालून ओरडला,
चाललो आहे रे नाक्यावर..
ये.. कटिंग घेऊ..
तो हसला, माझ्याकडे पहात म्हणाला..
हसत नाही रे लोक!
कोण हसतं ते आपण पाहू....
तो नको नको.. म्हणत होता
मी खाडकन खिडकी उघडली....
समोरच्या बाल्कनीतून मंजुळसा
आवाज आला..
"कधीतरी ही खिडकी उघडेल ही आशा होती..
छान लिहितोस... पण ते त्या खिडकीत..
कधीतरी असा समोर बसून पण बोलना"
तोच पक्या खालून ओरडला,
चाललो आहे रे नाक्यावर..
ये.. कटिंग घेऊ..
तो हसला, माझ्याकडे पहात म्हणाला..
हसत नाही रे लोक!
भरपूर धुरकटलेल्या
खोलीत आता मंद सुगंध होता..
बसं तो पीसीमात्र आता धुळीत होता...
खोलीत आता मंद सुगंध होता..
बसं तो पीसीमात्र आता धुळीत होता...
कविता खरंच ग्रेट. अप्रतिम. पण हे सारं आपण पीसीवर बसूनच करतो. म्हणजे विचार नाही म्हणत मी. पण तुमच्या मनातलं वादळ पीसीनच तर पोहचवलं माझ्यासारख्या अनेक वाचकांपर्यंत.
ReplyDeleteखरं आहे vijay Shendge!
ReplyDelete